घरफोडी करणाऱ्या आरोपीस आठ दिवसात मुद्दे माला सह अटक, गुन्हे शाखेच्या युनिट पाच ची कारवाई


पिंपरी (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )
गुन्हे शाखा, यूनिट ५ पिंपरी चिंचवड यांची उल्लेखनीय कामगिरीघरफोडी करणारे चार अट्टल चोरास ०८ दिसवसच्या आत गुन्हे शाखा युनिट-५ ने अटक करुन आरोपी कडुन २५,३२,०००/- रु किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे
वरिष्ठांच्या आदेशाने व सुचनेनुसार शिरगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत आठ दिवसापूर्वी दरोडा पडला होता
गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे तसेच सहा. पो. नि. श्रीधर भोसले, प्रशांत पवार,भरत माने, सचिन गोनट,अली शेख, अंजनराव सोडगीर,, दयानंद खेडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, बाबाराजे मुंडे असे समांतर तपास करत असतांना दाखल गुन्ह्यातील घटनास्थळापासुन लोणावळ्या पर्यंत जाणारे वेगवेगळा रस्त्याच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले.
गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन अल्टो गाडी नंबर एम.एच.१२ सी.डी.२१६५ हे असल्याचे निष्पन्न करुन, तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तसेच गोपनिय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे संशयित आरोपी शोध चालु सुरु केला होता
साईनगर वनविभागाचे जंगालात सापळा लावुन नमुद गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे १) यशोदास राठोड २) रितेश राठोड ३) आकाश मैनावत ४) ऋतिक मैनावत यांना शिताफीने ताब्यात घेतले.
सदर आरोपीकडे नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सदर गुन्हा आरोपी नामे १) यशोदास विजय राठोड वय २७ वर्षे रा. ओझर्डे ता. मावळ जि. पुणे. २) रितेश करणसिंग राठोड वय २७ वर्षे रा. वेहेरगाव ता. मावळ जि. पुणे ३) आकाश रवि मैनावत वय २९ वर्षे रा. भादस ता. मुळशी जि. पुणे ४) ऋतिक रवि मैनावत वय २१ वर्षे रा. भादस ता. मुळशी जि. पुणे ५) अभिषेक रंजित नानावत रा. पौड यांनी मिळून केला असल्याची त्यांनी कबुली दिली.
सदर आरोपी कडुन गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व चोरी गेलेले २७,१२,०००/- रु किंमतीचे ३६.६ तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्या पैकी ३५.६ तोळे सोन्याचे दागिने जसेच्या तसे आठ दिवसाच्या आत जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयक्तालय अंतर्गत देहुरोड युनिट पाच शोध मोहीम प्रमुखपदी वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री संतोष कसबे साहेब यांनी शिरगाव येथील जवळपास तीस लाख रूपयांचा दरोड्यातील आरोपींनी अतिशय चाणक्य नितीने अटक केली.

पी आय संतोष कसबे व त्यांच्या सहकाऱ्यांनच्या कर्तबगारीने गुन्हेगारीला मावळ तालुक्यात चाप व वचक बसणार आहे, शिवशाही व्यापारी संघ व बापू बिरू वाटेगावकर धंनगर समाज महासंघाच्या तसेच लहुजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, लहूजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ,व बापू बिरू वाटेगावकर धंनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.