दौंड कला केंद्र गोळीबार ”बाळासाहेब मांडेकर” यांना अटक…


पुणे | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुणे जिल्ह्यातील चौफुला येथील कला केंद्रात २१ तारखेला रात्री अकराच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समाज माध्यमांद्वारे वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यामध्ये सत्ताधारी आमदाराचा एक भाऊ असल्याची सुद्धा चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. मात्र याप्रकरणी तक्रारदार कुणीही पुढे येत नव्हते तर कला केंद्राचा मालक सुद्धा अशा पद्धतीने गोळीबार झालाच नसल्याचं सांगत होते. दबाव वाढल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी कला केंद्राचा मॅनेजरला ताब्यात घेतले. अखेर चौकशीअंती गोळीबार झाल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला. या चौकशीमध्ये आम्ही अत्यंत घाबरलो असल्याने तक्रार देण्यासाठी पुढे आलो नाही असं मॅनेजरने सांगितलं होतं. पण अखेर मॅनेजरच्या तक्रारीनंतर यवत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांच सुद्धा नाव होतं. बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाचा सहभाग असल्याचा आरोप होत होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी या आमदाराच्या भावाला ताब्यात घेतले आहेया प्रकरणी पुणे पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सख्ख्या भावाला अटक केली आहे. त्यामुळे आता आधीच मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या कारणाम्यामुळे अडचणीत असलेल्या अजित पवारांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. बाळासाहेब मांडेकर असं अटक झालेल्या आमदाराच्या भावाचं नाव आहे. ते भोर वेल्हा मुळशी विधानसभेचे आमदार शंकर हिरामण मांडेकर यांचे सख्खे भाऊ आहेत.