धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करणारे सराईत गुन्हेगार,सहकारनगर पोलीसांन कडुन जेरबंद


धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करणारे सराईत गुन्हेगार,सहकारनगर पोलीसां कडुन जेरबंद फिर्यादी
पुणे : सुमीत सुरेश रांगणेकर, केशव कॉम्प्लेक्स चिंतामणी गणेश मंदीराजवळ धनकवडी, पुणे यांची मारुती सियाज कार तत्तेच सार्वजनीक रोडवर नागरीकांनी पार्क केलेल्या इतर गाळ्यांच्या काचा अनोळखी इसमांनी लाकडी बांबू, दगडान फोडुन मोठ मोठयाने ओरडत “आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, आम्हास कोणी नडला तर त्यास सोडणार नाही” असे ओरडून नागरीकांमध्ये दहशत केली
त्या बाबत अनोळखी इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३२४ (१) (२), ३२४ (४), ३५१(२) (३) क्रिमीनल लॉ अमॅटमेंट कलम ७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अंगलदार अमोल पवार यांना बातमीदाराकडून बातमी निळाली ,
सदरचा गुन्हा करणारा इसम हा सहकारनगर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहीत आढाव याने त्याचे इतर साथीदार यांचे सह केला असुन तो त्याच्या मित्रास भेटण्यास नवले ब्रिज येथे येणार आहे
. बातमीतील वर्णनाचा इसम त्याचे साथीदारासह दुचाकी वरुन येवुन नवले ब्रिज जवळ गप्पा मारत थांबलेले दिसले. बातमी प्रमाणे खात्री होताच त्यांना स्टाफच्या मदतीने चारही बाजुंनी धेरुन पकडुन ताब्यात घेण्यात आले
१) रोहीत कैलास आबाव वय २१ वर्षे रा.मु. पो. किरकट वाढी ता. हवेली जि.पुणे २) सुधिर बाप्पु सावंत वय १९ वर्ष रा गोरावी वस्ती नांदेड फाटा ता. हवेली जि.पुणे असे असल्याचे सांगीतले.
त्यानी सदरचा गुन्हा त्यांचे इतर तिन अल्पवयीन साथीदारांसह केल्याचे सांगितल्याने त्यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेवुन सर्व आरोपीन कडे तपास केला असता सदर गुन्हयाची कबुली दिली आरोपी कडुन गुन्हयात वापरलेली तीस हजार – रूपये किंमतीची एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
सदर ची कारवाई पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, प्रदिप रेणुसे, अमित पदमाळे, महेश भगत, आकाश किर्तीकर, मारोती नलवाड, बजरंग पवार, सागर सुतकर, योगेश ढोले, खंडु शिंदे, यांनी केली आहे.