चिंचवड मध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये निवडणूक अधिकारी व भाजपा आमदारांच्या बैठकीची सखोल चौकशी करा:सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

maruti bhapakar

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुनावणी झाल्यानंतर प्रशासनात ‘प्राविण्य’ मिळविलेल्या एका शासकीय अधिका-यासह पालिकेच्या दाेन अधिका-यांबराेबर शहरातील भाजपच्या एका ‘दमदार’ आमदाराने चिंचवडमधील पंचताराकिंत हाॅटेलमध्ये सायंकाळी पाच ते पाऊणेसहा या दरम्यान पाऊण तास गुफ्तगू केल्याची संपूर्ण शहरात चर्चा आहे. या घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक मारुती भापकर यांनीमहापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे

त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवर संशयाचे धुके निर्माण झाले आहे. महापालिकेने 22 ऑगस्टला चार सदस्यीय पद्धतीने 32 प्रभागांची प्रारुप रचना जाहीर करून नकाशे प्रसिध्द केले. त्यानंतर या प्रभाग रचनेवर आलेल्या 318 हरकतींवर बुधवारी (दि.10) चिंचवड येथील ॲटो क्लस्टर सभागृहात एकाच दिवशी राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सुनावणी घेतली. महापालिकेची आगामी निवडणूक ही 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणेच हाेणार आहे.

ही रचना भाजपच्या मर्जीप्रमाणेच आणि भाैगाेलिक सलगता, माेठे रस्ते, प्रभागाची कशाही पध्दतीने माेडताेड केल्याचा आराेप राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिका-यांनी वारंवार केला आहे. त्यामुळेच 2017 मध्ये भाजपचे 3 नगरसेवकांवरून 77 नगरसेवक निवडून येऊन एकहाती सत्ता मिळविली. आगामी निवडणुकीसाठी 2017 चीच प्रभाग रचना कायम रहावी, यासाठी भाजपच्या आमदारांचा, पदाधिका-यांचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तर महायुतीमधीलच राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) प्रभाग रचनेत हरकतींच्या माध्यमातून बदल व्हावा, यासाठी प्रयत्नशील केला आहे. बुधवारी सुनावणी झाल्यानंतर प्रशासनात ‘प्राविण्य’ मिळविलेल्या एका शासकीय अधिका-यासह पालिकेच्या दाेन वरिष्ठ अधिका-यांबराेबर शहरातील भाजपच्या ‘दमदार’ आमदाराने चिंचवडमधील एका पंचताराकिंत हाॅटेलमध्ये पाऊण तास गुफ्तगू केली आहे

त्यामुळे भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कायद्याची, नियमांची पायमल्ली करित असल्याचे उघड झाले आहे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे काम करत आहे.खरे तर आपण निवडणूक अधिकारी आयुक्त म्हणून या सुनावणीसाठी उपस्थित असणे अत्यंत गरजेचे होते. मात्र आपण या सुनावणीला उपस्थित नव्हता.

महापालिकेच्या प्रभाग रचना व त्यावर झालेल्या सुनावणी बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने ताब्यात घेऊन या बैठकीमध्ये सामील असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी. जर आपण ही कारवाई केली नाही तर आपली तक्रार मा. मुख्यमंत्री व निवडणूक आयोगकडे करावी लागेल

Latest News