पिंपरी चिंचवड महानगरपालिका अभियंता असोसिएशन च्या वतीने अभियंता दिन विविध कार्यक्रमाने साजरा




प्भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभिवादन…
..पिंपरी, : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीत विश्वेश्वरय्या यांचे भव्य रांगोळी चित्र रेखाटून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड इंजिनिअर्स असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मनपाच्या मुख्य कार्यालयामध्ये व प्रभागामध्ये स.१०.३० वा अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी किशोर गोखले – उप संचालक, नगररचना व विकास विभाग, बापू गायकवाड – सह शहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, अण्णा बोदडे – उपायुक्त, किरण गायकवाड – विशेष अधिकारी, माहिती जनसंपर्क विभाग व पिंपरी चिंचवड इंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने सुनिल बेळगावकर – अध्यक्ष, चंद्रकांत कुंभार – कार्याध्य, संतोष कुदळे – सचिव व इतर संचालक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहर अभियंता मकरंद निकम यावेळी म्हणाले की, ‘शहरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,अशा नवकल्पना राबविणारे अभियंते हे शहराच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांना सुरक्षित रस्ते, स्वच्छ पाणी, कार्यक्षम मलनिस्सारण व्यवस्था, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि टिकाऊ शहरी विकासाची हमी मिळते.’
अभियंता दिनाचे औचित्य साधुन पिंपरी चिंचवड इंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने क्रिकेट, कॅरम, रायफल शुटींग, बुद्धीबळ, बॅटमिंटन, रांगोळी, पाककला व मेंहदी या सारख्या स्पर्धा राबविणेत आलेल्या होत्या. त्यामध्ये सर्व अभियंत्यानी उत्स्फुर्त पणे सहभाग घेवुन पारितोषिक पटकाविले. तसेच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेषागृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरीता मनपामार्फत प्रमुख अध्यक्ष म्हणून मा. प्रदिप जांभळे पाटील – अतिरीक्त आयुक्त -१ व प्रमुख अतिथी अविनाश पाटील – संचालक, नगररचना, प्रमुख वक्ते अमित आंद्रे (AI) – मुख्य कार्यकारी अधिकारी, द डेटा टेक्ट लॅब, प्रमुख वक्ते बलविंदर चंडोक- व्यवस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रमोद ओंभासे – मुख्य अभियंता, संजय कुलकर्णी – मुख्य अभियंता , मनोज लोणकर – सह आयुक्त व पिंपरी चिंचवड इंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने सुनिल बेळगावकर – अध्यक्ष, चंद्रकांत कुंभार – कार्याध्य, संतोष कुदळे – सचिव व इतर संचालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
