कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस मध्ये फसवणूक करू नका मनसे च्या रुपेश पटेकर यांचा आयुक्ताना इशारा


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये अतिशय दुर्बल घटकातील नागरिक प्रथम श्रेणी पासून ते चतुर्थ श्रेणी पर्यंत काम करत आहेत. या कामगारांवर दरवर्षी दिवाळी बोनस वर अन्याय केला जातो आणि शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यावर आवाज उठवतात आणि त्यांचा दिवाळी बोनस साठी आग्रह धरतात. त्यावेळेस आंदोलनही केले जाते. आंदोलन करून निदर्शने केले जातात त्यावेळेस महापालिकेला जाग येते आणि महापालिकेतील अधिकारी त्या गोरगरीब कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा बोनस देण्यासाठी त्या ठेकेदाराला सांगतात.
दरवर्षी कंत्राटी कामगारावर अन्याय केला जातो दिवाळी बोनस वेळेत दिला जात नाही आणि रक्कमही कमी दिली जाते नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस प्रमाणे कंत्राटी कामगारांना महिन्याचा पगार देणे बंधनकारक असूनही त्यामधील कामगारांचा बोनस ते पगारांमधून कट करून घेतात.
तर काही ठेकेदार प्रति महिन्याच्या पगारातच बोनस दिला जातो. पण आमच्या असे निदर्शनात आले आहे की पगार मधून दिवाळी बोनस कट केला जातो तो दिवाळी बोनस नियमाप्रमाणे दिला पाहिजे तो बोनस 5000 रुपये किंवा 7000 रुपये असा दिला जातो नियमाप्रमाणे मिनिमम वेजेस प्रमाणे व महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण विभागाला आणि महापालिकेला कंत्राटी कामगार संबंधित जो नियम व अटी दिल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे दिवाळी बोनस देणे बंधनकारक आहे.
दिवाळी बोनस हा एक पगार दिला पाहिजे.पण आपल्या महापालिकेत कंत्राट घेणारे ठेकेदार चतुर्थ श्रेणी तसेच इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देत नाहीत अशा ठेकेदारांना वेळीच आळा घातला पाहिजे.आपण त्वरित दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश काढावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिवाळी बोनस न दिल्यास आयुक्ताच्या दालनात दिवाळीचे फटाकडे फोडण्यात येतील असा इशारा. मनसे नेते – रुपेश बाजीराव पटेकर यांनी आयुक्ताना दिला आहे