महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले 15 जानेवारी ला मतदान तर 16 ला मतमोजणी

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपरी – सर्वांची उत्सुकता लागलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे आणि लगेचच १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय क्षेत्राबरोबरच सामान्य नागरीकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे –
नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
नामनिर्देशन अर्जांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप/अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
मतदान – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी – १६ जानेवारी २०२६
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला
. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.
- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
- उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
- चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
- मतदान – 15 जानेवारी
- निकाल – 16 जानेवारी
एकूण मतदार – 3.48 कोटी
एकूण मतदार केंद्र – 39,147
मुंबईसाठी मतदार केंद्र – 10,111
कंट्रोल यूनिट – 11,349
बॅलेट यूनिट – 22,000
1
