पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी मध्ये सामिल होऊन निवडणूक लढवावी :छाया सोळके
Oplus_131106

पिंपरी- (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना ) ज्या उमेदवारांना या शहराबद्दल खरे प्रेम आहे शहर आपले आहे अशी भावना आहे आणि जे निवडून येण्याची क्षमता ठेवतात, अशा सर्व उमेदवारांनी पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे आवाहन अध्यक्ष छाया सोळंके यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
चिंचवड परिवर्तन विकास आघाडी ही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी कृत असलेला पक्ष आहे. हा पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जास्तित जास्त जागा लढवणार आहे
. सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे. या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधारी, विरोधी पक्ष तसेच मुजोर वरिष्ठ महापालिका अधिकारी यांची थेट ६०:४० ची भागीदारी (पार्टनरशिप) असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जोपर्यंत या सर्व पक्षांना आणि त्यांच्या हस्तकांना महापालिकेतून हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार थांबणे अशक्य आहे.
महापालिकेला भ्रष्टाचारमुक्त करणे हा पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अजेंडा असेल.पिंपरी चिंचवड शहर हे राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक शहरांपैकी एक असताना, आज सामान्य नागिरीक मूलभूत सुविधासाठी झगडतो आहे. विकासाचे फलक, पुरस्कार प्रसिध्दीमाध्यमातून झळकतात. पण प्रत्यक्षात शहरातील नागरिकांच्या जीवनात विकास पोहचलेला नाही.
पाणी, ड्रेनेज, रस्ते वाहतूक, सर्वाजनिक वाहतूक, आरोग्य व्यवस्था शहरातील रुग्णालयाकडून नागरीकांची होणारी लूट थांबविण्यासाठी ठोस धोरण व नियत्रंण नाही, रोजगार व स्थानिक हक्क, झोपडपट्टी पुनर्वसन प्रसल्पामध्ये मुळ रहिवाशी, भाडेकरु यांच्यावरील अन्याय, कचरा, पर्यावरण प्रदूषण, महिलांची सरक्षिता, गुन्हेगारी, अमली पदार्थाचा वाढता प्रभाव, ठेकेदार-राजकारणी-अधिकारी यांची भ्रष्ट साखळी, नागरीकांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष केले जाते अशा अनेक समसम्याकडे येथील कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही.
.पिंपरी-चिंचवड शहरातील मूळ भूमिपुत्र व स्थानिक रहिवाशांच्या शेती, घरे आणि जमिनींवर बिल्डरधार्जिणे डीपी (Development Plan) व टीपी (Town Planning) लादण्यात आले आहेत. हे अन्यायकारक व जनतेविरोधी निर्णय तात्काळ रद्द झाला पाहिजे होता
हे बांधकाम व्यावसायिक आहेत. यामुळे हा निर्णय रद्द होण्यासाठी सत्ताधारी व विरोधक यांना महापालिका निवडणूकीत पराभव करणे गरजेचे आहे ज्याने करुन ते सभागृहात पोहचनार नाहीत. व आताही सभागृहात असलेले बहुतांशी सत्ताधारी विरोधक संदस्य हे बांधकाम व्यावसायिक व एस.आर.ए बहाद्दरच आहेत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देणे, तसेच आरोग्य व वैद्यकीय सुविधांवर विशेष भर देणे हे आमचे प्राधान्य असेल. शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडलेली असताना चिखली परिसरात सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारणे अत्यावश्यक आहे. रेड ओन बाबत महापालिका प्रशासन रावेत किवळे येथे वेगळी भुमिका व रुपीनगर तळवडे येथे वेगळी भुमिका घेत आहे.
आघाडीतील उमेदवारांना कोणत्याही व कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे, स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याची पूर्ण मुभा असेल. कोणताही निर्णय घेताना मुंबई, दिल्ली, बारामती किंवा नागपूर येथील कोणत्याही नेत्यांच्या आदेशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही.
पिंपरी-चिंचवडचा कारभार पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी, इथूनच चालवला जाईल, हाच आमचा संकल्प आहे. जर शहर आपले असेल तर सरकारही आपलेच असले पाहिजे त्यामुळेच आम्ही आपले शहर आपले सरकारचा नारा दिला असून मतदार आम्हांला नक्कीच साथ देतील. तरी अनेक प्रामाणिक उमेदवारांनी हे शहर वाचवण्यासाठी व भ्रष्ट पक्ष व नेतेमंडळी यांना महापालिकेतून हद्दपार करण्यासाठी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी मध्ये सामिल होऊन निवडणूक लढवावी असे आवाहन छाया सोळके यांनी पत्रकारपरिषदेत केले आहे
