महाराष्ट्र मजूर पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व प्रभागात स्वबळावर लढणार – भाऊसाहेब अडागळे

पिंपरी, पुणे (दि.१९ डिसेंबर २०२५) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महानगरपालिका सह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत “मजूर शक्ती हीच राष्ट्र शक्ती” हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र मजूर पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुका लढणार आहे. राज्याच्या राजकारणात व विकासात पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिके चा स्वतंत्र ठसा आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगारासाठी राज्याच्या ग्रामीण भागातून येथे कष्टकरी, मजूर झोपडपट्टीत येऊन रहात आहेत. घाम गाळून कष्ट करत आहेत. या मजुरांना, कष्टकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात, शिक्षणात, राजकारणात हवी तेवढी संधी मिळाली नाही. यासाठी मजुरांचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांचा आवाज सभागृहात पोचविण्यासाठी “महाराष्ट्र मजूर पक्षाचे” संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी पिंपरी येथे महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, महिला शहराध्यक्ष सविता आव्हाड, शहर अध्यक्ष सुरेश मिसाळ, प्रदेश खजिनदार मोहन कांबळे, हवेली तालुका अध्यक्ष मीना रणदिवे, अल्पसंख्यांक सेल पुणे जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, वाहतूक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भिसे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष राजू लोनके आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना भाऊसाहेब अडागळे यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने सत्ता मिळवली होती. परंतु त्यांनी मजूर व कष्टकरी कामगारांकडे नेहमी दुर्लक्ष केले, त्यांच्यावर अन्याय केला आहे. या महापालिका क्षेत्रामध्ये झोपडपट्ट्या वाढत आहेत. अजूनही कष्टकरी मजूर, कामगार प्राथमिक सेवा, सुविधांशिवाय उपेक्षित जीवन जगत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत ७८ झोपडपट्टी आहेत. त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र मजूर पक्ष पाठपुरावा करीत होता. त्यामुळेचपिंपरी चिंचवड शहरातील काही झोपडपट्टीमध्ये एसआरए चे प्रकल्प सुरू झाले आहेत. मात्र त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना विकसकाकडून त्रास देण्यात येत आहे. या मध्ये त्या परिसरातील स्वयंघोषित नेते, गावगुंड आणि काही अधिकारी सामील आहेत. एसआरए चे अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेतच आहेत. या ठिकाणी तसेच शहरात सर्वत्र सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही.
कित्येक वर्ष झाले पुणे मुंबई महामार्गचे काम चालूच आहे ते संपतच नाही. शहरात विकसित केलेले सर्व बीआरटी मार्ग पार्किंग झोन म्हणून वापरले जात आहेत. पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील देखील बीआरटी प्रकल्प हटवून रस्ते विस्तारित केले पाहिजेत. संथ गतीने सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून तासंतास पुणे नाशिक महामार्ग पुणे मुंबई महामार्गावर प्रवासी अडकून पडत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह इतर ७ मोठी रुग्णालय चालवत आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा, सुविधा देण्यासाठी पुरेशी कर्मचारी व अधिकारी उपलब्ध नाहीत. या ठिकाणी सर्वच जागांवर ठेकेदारी पद्धतीने अकुशल कामगार नेमून नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याचे पाप प्रशासन करत आहे. या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पैशावर अधिकारी, पुढारी व ठेकेदार स्वतःचे खिसे भरत आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सक्षम वैद्यकीय आरोग्य सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र मजूर पक्षाचे प्रतिनिधी सभागृहात असले पाहिजेत. यासाठी पिंपरी चिंचवड सह पुणे महापालिकेतील सर्व प्रभागात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे असे भाऊसाहेब अडागळे यांनी सांगितले.
निगडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा व स्मारक उभारण्यात आली आहे. मेट्रोमुळे त्यास बाधा पोहचत आहे. त्याचप्रमाणे चिंचवड स्टेशन चौकातील लहुजी वस्ताद साळवे पुतळा आणि वासुदेव फडके यांचा देखील पुतळा परिसराची दुरावस्था झाली आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे हे वेळोवेळी लक्षात आणून देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
मागील चार वर्षाच्य…
