प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीला खिंडार; भाजपाचा विरोधकांना ‘मास्टर स्ट्रोक’

Backup_of_ps logo rgb

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना २४ तास उलटण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. प्रभाग १७ मधील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.

अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ‘भाजप उमेदवारांवर दबाव टाकत आहे’ असा आरोप केला होता. मात्र, शनिवारी निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यामुळे अजित पवारांचे आरोप तथ्यहीन असल्याचे सिद्ध झाले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख चेहरे:

शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना मा.श्रीधरभाऊ वाल्हेकर – माजी सभापती शिक्षण मंडळ, मा. राजेंद्र साळुंके – माजी नगरसेवक, मा. संदीप चिंचवडे – मा. नगरसेवक, मा. विनोद कांबळे – सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मा. सुरेंद्र भोईर – सामाजिक कार्यकर्ते, मा.नगरसेविका सुषमा तनपुरे, मा. सौ. रुपाली सचिन वाल्हेकर, मा. रत्नाताई भापकर, मा. सौ. मिराताई वाल्हेकर, मा. श्री. सचिन श्रीधर वाल्हेकर – उपाध्यक्ष पिंपरी विधान, मा.सुर्यकांत पात्रे – उपाध्यक्ष सामाजिक न्याय, मा. सुभाष वाल्हेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्पा जवळ प्रचाराचा शुभारंभ करताना प्रवेश करण्यात आला.

“टीकेला विकासाने उत्तर देऊ” – शंकर जगताप

यावेळी बोलताना निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले की, “भाजप आपल्या कार्यकर्त्यांवर कधीही अन्याय करत नाही. विरोधकांकडे मुद्दे संपले की ते तथ्यहीन आरोप करू लागतात. आम्ही त्यांच्या टीकेला टीकेने उत्तर न देता ‘विकासाच्या व्हिजन’द्वारे पिंपरी-चिंचवडचे नवे पर्व दाखवून देणार आहोत.”

निवडणुकीचे समीकरण बदलले

या मोठ्या फेरबदलामुळे प्रभाग १७ सह संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद कैक पटीने वाढली आहे. निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या संयुक्त रणनीतीमुळे विरोधकांचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Latest News