कार्यक्रमाला परवानगीच नव्हती तर कार्यक्रमस्थळी आयपीएस ऑफिसर आणि पोलीस कर्मचारी काय करत होते? -राधा पाटील

radha patil

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्रही मी काढलं आहे. त्याची पावती माझ्याकडे होती, ती मी दिली होती. जर आधीच सांगितलं असतं की परवानगी नाहीय, तर आम्ही आलोच नसतो. आमचा व्हॅनिटीचाही खर्च वाचला असता. मी आजवर कधीच परवानगीशिवाय शो केलेला नाहीय. माझी लोकप्रियता वाढत असल्याने मला खाली पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय. पण माझ्यावर प्रेम करणारे अनेकजण आहेत, त्यामुळे मी खाली पडणार नाही, असंही राधा पाटील म्हणाली.कार्यक्रमाला परवानगीच नव्हती तर कार्यक्रमस्थळी आयपीएस ऑफिसर आणि पोलीस कर्मचारी काय करत होते? तिथे साऊंड सिस्टिमही चालू होती.

मी माझ्या प्रमाणपत्राची पावतीही पोलीस ठाण्यात दिली होती. माझी मॅनेजरही तिथे दोन वाजल्यापासून हजर होती. आयोजकांनी व्हॅनिटीमध्ये येऊन मला शो चालू करायला सांगितली. तिथं खुद्द आयपीएस ऑफिसर हजर असल्याने मला वाटलं की कार्यक्रमाला परवानगी असेल. म्हणून मी तो कार्यक्रम चालू केला. माझ्या ग्रुपमधील मुलींचे दोन डान्स झाले. मग माझी एन्ट्री झाली. खालून मॅडमने व्हिडिओही काढला. त्यानंतर तुम्ही कार्यक्रम बंद करून गुन्हा दाखल केला. हे असं का केलं असेल हा प्रश्न पडला आहे. अनेक मुलींनी माझ्यापेक्षाही अश्लील हावभाव करत नृत्य केलं आहे.

दहीहंडी उत्सवात विनापरवाना अश्लील नृत्य सादर केल्याच्या आरोपावरून पुण्याच्या बिबवेवाडी पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर राधा पाटील हिने तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. “आम्ही साडी नेसतो, साडीत कंबर आणि पोट दिसणे स्वाभाविक आहे; मग यात अश्लीलता काय आली?” असा घणाघात तिने केला. कारवाईवर आक्षेप घेत राधा पाटील म्हणाली,

साडीत पोट दिसणं साहजिकच आहे. बाकी काय वाईट दिसतंय? माझा डीजे शो असल्याने मला टार्गेट केलं जातंय. डीजे शोमध्ये मॅशप असतं. मॅशप ड्रेस घालून तर करता येणार नाही. मग साडीच नेसावी लागते. माझ्या शोमध्ये दोन ते तीन लावणी होतात. माझा गेटअप का दाखवला जात नाही? असं राधा पाटील म्हणाली.

आम्ही साडी नेसतो. साडीत कंबर दिसणं साहजिकच आहे, मग यात अश्लिलता काय? असा प्रश्नही राधा पाटीलने उपस्थित केलाय. माझे हातवारे कधीच अश्लील नसतात. माझा एकही व्हिडिओ दाखवा ज्यात मी अश्लील हावभाव केले आहेत. फक्त माझं पाटील आडनाव आहे, म्हणून मला टार्गेट केलं जातंय का? एका पाटीलने घाण केलीय म्हणून दुसरी पाटीलही घाणच करणार असं होतंय का? असा संतापही तिने व्यक्त केला.

Latest News