तबलिघी 1023 जण कोरोना गृहस्थ- केंद्रीय मंत्रालय

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच जात असून आजच्या घडीला २९०१ कोरोनाबाधित रुग्ण भारतात आहेत. त्यापेकी १०२३ रुग्ण हे तबलिघीशीसंबंधित आहेत, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या २४ तासांत ६०१ रुग्ण वाढले आहेत. तर १२ रुग्णांचा मृत्यू झालाय, अशीही माहिती मंत्रालयाने दिली. देशातील २९०१ रुग्णांपैकी ०-२० वयाचे ९ टक्के रुग्ण आहेत. २१-४० वयोगटातील ४२ टक्के, ३३ टक्के रुग्ण हे ४१-६० वयोगटातील आणि १७ टक्के रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. तर, कोरोनाविरोधात मुकाबला करण्यासाठी ११ हजार ९२ कोटींची निधी राज्य सरकारांना देण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले. दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलिघी जमात मकरझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल २२ हजार जणांना देशभरात क्वारंटाइन करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशात तबलिघींसंबंधी १७ राज्यांमध्ये करोनाचे १०२३ रुग्ण सापडले आहेत. ही संख्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३० टक्के आहे.

Latest News