“तबलिगींनी” स्वत:हून माहिती द्यावी- मुंबई पोलिस

मुंबई : मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिल्लीच्या मरकजवरून आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांनी पुढे येऊन स्वत:ची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी किंवा 1916 या महानगरपालिकेच्या टोल फ्री नंबरवर कळवावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. माहिती लपवल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं की, दिल्लीच्या मरकज येथून आलेल्या तबलिगी समुदायाने आपल्या प्रवासाची माहिती @mybmc helpline 1916 वर कळवा आणि कोरोनाशी लढण्यास सहकार्य करा. जे कुणी मरकजवरून आले असतील आणि ते समोर येऊन सांगणार नाही किंवा माहिती लपवतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलीग़ी मरकजचा भाग असलेल्या सर्वांनी बृ.मुं.म.पा च्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती. असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.#TakingOnCorona — Mumbai Police (@MumbaiPolice) April 6, 2020 कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीतील मरकजवरून आलेल्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सहकार्य करावं, असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याद्वारे करण्यात आलं आहे. 8 मार्च रोजी दिल्लीमध्ये मरकजचा कार्यक्रम पार पडला होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तबलिगी समाजाने सहभाग घेतला होता. दिल्लीतून 1400 तबलिगी समाजची लोक ही महाराष्ट्रात आली होती. त्यातली 1300 लोकांचा पत्ता लागला असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आला आहे. मात्र दिल्लीवरून नवीन सूचना येत आहेत. ज्यामध्ये अजून तबलिगी लोक इथे असण्याचं म्हटलं गेलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी कडून सुद्धा ताब्लिकी लोकांना पुढे येऊन सहकार्य करण्यास आव्हान करण्यात आलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीतील मरकजवरून आलेल्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सहकार्य करावं, असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याद्वारे करण्यात आलं आहे. 8 मार्च रोजी दिल्लीमध्ये मरकजचा कार्यक्रम पार पडला होता ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तबलिगी समाजाने सहभाग घेतला होता. दिल्लीतून 1400 तबलिगी समाजची लोक ही महाराष्ट्रात आली होती. त्यातली 1300 लोकांचा पत्ता लागला असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आला आहे. मात्र दिल्लीवरून नवीन सूचना येत आहेत. ज्यामध्ये अजून तबलिगी लोक इथे असण्याचं म्हटलं गेलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी कडून सुद्धा ताब्लिकी लोकांना पुढे येऊन सहकार्य करण्यास आव्हान करण्यात आलं आहे.

Latest News