तेलंगणात लॉकडाऊन 3 जूनपर्यंत केला- मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव

तेलंगणा- २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र तेलंगणामध्ये लॉकडाऊनचा कालावधी ३ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ही माहिती दिली. तेलंगणा राज्याप्रमाणेच इतर राज्यही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. देशात बाधितांची संख्या वाढत असून ही संख्या कमी होणं गरजेचं आहे. नव्याने रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट झाल्यास देशात काहीतरी सकारात्मक घडेल अन्यथा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातंय.