नोटबंदीपेक्षा ही भयंकर ‘लॉकडाऊन’ आहे ही मोठीच चूक- कमल हसन


नवी दिल्ली – कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने केंद्र सरकारने भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केलाय. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनविरोधात लोकांनी टीका करायला सुरुवात केली. अभिनेत, दिग्दर्शक कमल हसन यांनीही मोदींवर सडकून टीका केली आहे. लॉकडाऊन ही तर नोटाबंदीपेक्षा मोठी चूक आहेस असं हसन म्हणाले आहेत. कमल हसन यांनी एक पत्र लिहून ही टीका केली आहे. या पत्राची कॉपी त्यांनी ट्विट केली आहे
ते पत्रात म्हणतात की, “लॉकडाऊनचा निर्णय मला पटलेला नाही. लॉकडाऊन करून तुम्ही नोटाबंदीपेक्षा मोठी चूक केली आहे असं मला वाटतं. २३ मार्चला मी तुम्हाला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये मी तुम्हाला विनंती केली होती, की लॉकडाउन करु नका. अन्यथा देश आर्थिक संकटात सापडेल. मात्र तुम्ही तेच केलं ज्याची भीती होती. आज गरीबांकडे दोन वेळचं अन्न नाही. देशातील लाखो लोक आज बेरोजगार होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. परंतु तरीही जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला. मात्र तुमचा निर्णय पुर्णपणे चुकला असं मला वाटतं.” अशा आशयाचे पत्र कमल हसन यांनी नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.