कायदा/सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये राज्याचे चांगले काम सुरू आहे. मात्र, मरकजमध्ये सहभागी लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकता ठेवावी. कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सुचना राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याने लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन कार्यरत ठेवावी. स्थलांतरित कामगार, मजूर व बेघरांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वांना भोजन, औषध आदी सुविधा देण्यासोबतच तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी असेही राज्यपालांनी सांगितलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच कोरोनाव्हायरसचे रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद. कोरोना संक्रमण थांबविण्याबाबतच्या उपाययोजनांचा घेतला आढावा. प्रत्येक जिल्ह्याने लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन कार्यरत ठेवावी. स्थलांतरित कामगार, मजूर व बेघरांसाठी सुरू केलेल्या शिबिरांमध्ये सर्वांना भोजन, औषध आदी सुविधा देण्यासोबतच तेथील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी असे आदेश दिले आहेत.

Latest News