पुणे शहरातील सर्व पेठा आज पासून सील करण्यास सुरवात…

पुणे प्रतिनिधि : पुणे शहरातील करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. भारतातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या विचारात घेता, येत्या काळात पुणे शहरात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणेकरांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे. सबब साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ (एपिडमिक अॅक्ट) मधील तरतुदींनुसार, पुणे शहरातील कोंढवा परिसर, सर्व पेठांचा परिसर (महर्षिनगर ते आरटीओ कार्यालय यादरम्यान) काही पोलिस ठाण्यांच्या अंकित असलेला सोबतच्या नकाशात दर्शविलेला परिसर (परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

आज सोमवार, दि. ०६ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्री बारा वाजेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. त्यानुसार सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख या भागाच्या हद्दी सील करतील. त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात येत आहे. पुणे- पुण्यात एका दिवसात 36 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील पुणे आरटीओ ते गुलटेकडी हा भाग सिल करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. त्यात गंज पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ ते गुलतेकडीपर्यंतचा परिसर सिल करण्यात येणार आहे. त्या परिसरातून कोणाला ये- जा करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे. दरम्यान, या भागात राहत असलेल्या जनतेला सगळ्या जीवनावश्यक वस्तू तिथेच पुरवण्याची सोय करण्यात येणार आहे. एका दिवसात कोरोनाबधितांचा आकडा झटक्यात वाढल्याने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. तथापि, १) सदर आदेशामधील निर्बंधातून कृषि उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक जावक यांना वगळण्यात येत आहे. २) सदर परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना यामधून वगळण्यात येत आहे. पुढील काळात शहरातील रुग्णांची संख्या विचारात घेता टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांत देखील या प्रकारचे निर्बंध लागू करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी लागणारे जीवनावश्यक साहित्य गर्दी न करता प्राप्त करून घेऊन पूर्वतयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Latest News