पुण्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी फक्त 2 तासच राहणार दुकानं खुली…

पुणे: पुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील चार भागांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला अध्यादेशही निघाला असून आज (दि.७) रात्री ७ वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच या काळात रुग्णालयं आणि मेडिकल्स वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं केवळ दोनच तास खुली राहणार आहेत. आणि गोपनीयता १२१ लोक याविषयी बोलत आहेत पुणे शहरात आधीच संचारबंदी लागू असताना देखील काही भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढल्याने शहरातील काही भागांमध्ये पूर्वीच्या आदेशांमध्ये अंशतः बदल करुन नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये संचारबंदी अधिक कडक करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणतात, “खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा या चार पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार करणे, वाहतुक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. ७ एप्रिल २०२० पासून संध्याकाळी ७ वाजल्यापासून १४ एप्रिल २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत

Latest News