पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीने दररोज 30,000 लोकांना मदतीचा हात…

पिंपरी : कोरोना विषाणू संसगार्मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक स्वत:ची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान देत आहेत. या यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागातील सुमारे २९,९५३ गरजू व्यक्तींना डब्बे व फूड पॅकेटमार्फत अन्न वाटप करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्तून शहरातील विविध भागात दररोज वाटप करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून या प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाउंडेशन, राकेश वाकोर्डे फाउंडेशन, समप्रिय, पीसीसीएफ, पोलीस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिवभोजन, संस्कार सोशल फाउंडेशन, धर्म विकास संस्था सहभागी झाल्या आहेत. रोजगार नसणाऱ्या अथवा स्थलांतरित मजुरांसाठी ३११ ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये २१३ नागरिक राहत असून त्यांनाही निवारा व भोजनासह तपासणीची सुविधा केली आहे.
अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उर्दू शाळा खंडोबामाळ, आकुर्डी येथे ७८, ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केशवनगर विद्यालय येथे ३६, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय येथे २१, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत छत्रपती शिवाजीमहाराज विद्यालय, भोसरी येथील संकुलात ४३, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे १८, तर पिंपरी येथील रात्र निवारा केंद्रात १७ असे एकूण २१३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था केली आहे