नव्या योजना ”वर्षभरासाठी स्थगिती” – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. यासाठी अर्थव्यस्था पुन्हा स्थिरावण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील एक वर्षासाठी नव्या योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. तसंच त्यावर होणाऱ्या खर्चावर देखील रोख लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या नव्या योजना थेट ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय वित्त मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात सरकारची कोणतीही नवी योजना लागू केली जाणार आहे. मात्र असं असलं आत्मनिर्भर भारत अभियान, पंतप्रधान गरीब कल्याण योजना आदींना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही विभागाने नव्या योजनेची घोषणा करू नये, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. ही स्थगिती स्वीकृत किंवा मूल्यांकन श्रेणीतील योजनांना देण्यात आली आहे. तसंच वित्त मंत्रालयाच्या जावक विभागाने तत्वत परवानगी दिलेल्या योजनांसाठीही हा आदेश लागू होईल. सध्या आत्मनिर्भर भारत आणि पंतप्रधान गरीब कल्याण आदी योजनांवर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईसाठी केंद्र सरकारने नुकतंच आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जारी केलं. ज्यामध्ये शेतकरी, मजूर, सामान्य नागरिक, लघु व माध्यम उद्योग अशा विविध बाबींचा यात समावेश करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनने अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान केलं आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दिलासा म्हणून या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

Latest News