देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान 3 लाख पार

नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान वाढत असून आता एकूण आकड्याने ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी ११ हजार 458 नव्या रुग्णांची भर पडली असून, ३८6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण, ३ लाख ८ हजार ९९३ रुग्ण आहेत.सध्या देशात 145779 रुग्णांवर उपचार सुरू असून, 154330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, एकूण मृतांचा आकडा 8884 वर पोहोचला आहे.एकाच दिवसांत ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने सर्वाधिक रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका आणि ब्राझील हे अनुक्रमे पहिल्या दोन क्रमाकांवर आहेत. २ जून रोजी देशात २ लाख रुग्ण होते. मात्र १२ जूनपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांनी वाढला. म्हणजे अवघ्या १० दिवसांत १ लाख रुग्ण वाढले आहेत.