”पेट्रोल-डिझेलच्या” किंमतीने पुन्हा उसळी

petrol-33

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने पुन्हा उसळी घेतली असून आज सहाव्या दिवशीही इंधनात दरवाढ झाली आहे. त्यानुसार, मुंबईत आज पेट्रोलची किंमत ८२.१० रुपये झाली आहे. तर, डिझेल ७२.०३ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.१६ रुपये झाला असून डिझेलसाठी ७३.३९ रुपये आहे.

दिल्लीत पेट्रोल ५९ पैसे आणि डिझेल ५८ पैशांनी महागले आहे. कोलकात्यात पेट्रोल ७७.०५ रुपये असून डिझेल ६९.२३ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ४६ पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ७८.९९ रुपये असून डिझेल ७१.६४ रुपये आहे.

गेल्या सहा दिवसांत पेट्रोल ३.९० रुपयांनी महागले आहे. डिझेलच्या किमती सरासरी ४ रुपये प्रती लीटरने वाढल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवार ७ जूनपासून दररोज इंधन दर आढावा घेण्याची पद्धत सुरु केली. कोरोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजचा इंधन आढावा स्थगित केला होता. जागतिक बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव १ टक्क्याने वधारला आणि ३८.९४ डॉलर प्रती बॅरल झाला.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस ८ रुपये आणि अबकारी कर दोन व पाच रुपयांनी वाढवला आहे.

Latest News