देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियताच….


मुंबई | महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे. त्यामुळे आकस बुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांसोबत महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नसल्याचंही पडळकर म्हणाले.