पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतूनभंडारा दुर्घटनेतील जखमीना मदत

नवी दिल्ली  भंडारा या दुर्घटनेत जी बालकं गंभीर जखमी झाली आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणाही केंद्र सरकारने केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून आज ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही रक्कम दिली जाणार असल्याचं कळतंय.दरम्यान, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला आग लागली होती. यावेळी रुग्णालयात धूर जमा झाल्यामुळे अतिदक्षता विभागात ठेवलेल्या तब्बल 10 बालकांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला होता.