पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जानेवारी २०२१ मध्ये जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये घसरण

पिंपरी प्रतिनिधी: रँकिंगचा खर्च, प्रकल्प अंमलबजावणी आणि नागरी संस्थांची कामगिरी इत्यादी विविध मापदंडांवर आधारित आहेमार्च २०२० मध्ये ६९ आणि गतवर्षी मे २०२० मध्ये १९ व्या स्थानांवरून पीसीएमसी जानेवारी २०२१ मध्ये ४१ व्या स्थानांवर घसरला आहे. पुणे शहर जे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावरचे शहर होते ते आता क्रमवारीत १८ व्या स्थानावर आला आहे तर नाशिक २० व्या स्थानावर आहे तर, ठाणे या यादीत २३ व्या स्थानावर आहे. पीसीएमसीच्या तुलनेत इतर शहरांनी चांगली कामगिरी केली.स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात ११२५ कोटी रुपयांचे विविध प्रकल्प पीसीएमसी प्रशासनाने ऑगस्ट २०१८ पासून हाती घेतले. त्यापैकी काही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. ज्यामुळे शहराच्या रँकिंगवर परिणाम झाला आहे. शहर तिसऱ्या टप्प्यात सामील होते तर, इतर स्मार्ट सिटी रँकिंगच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या संदर्भात स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेचे समन्वयक म्हणून काम पाहणारे अधिकारी निळकंठ पोमन यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आपण केलेल्या विविध कामांची माहिती भरण्याचे काम अद्याप सुरू आहे. तो डेटा पूर्ण भरून झाल्यावर समजेल. शुक्रवारी त्याबाबत निश्चित समजेल. जसजशी माहिती भरून होईल तसतशी क्रमवारी बदलते. आज पिंपरी चिंचवड २७ व्या क्रमांकावर आहे.