दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना अटक:क्राईम ब्रँच युनिट एकची कारवाई

पुणे प्रतिनिधी: रोजी युनिट – १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पुणे शहरात खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर मालमत्तेविरुध्द गुन्हे घडु नये त्यास प्रतिबंध करुन कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता व जनेतेचे मालमत्तेचे नुकसान होवु नये म्हणुन हददीत प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारांना
जेरबंद करण्याकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, काही इसम दुचाकीवरुन आंबेडकर रोड, मंगळवार पेठ, येथील पेट्रोल पंपावर घातक शस्त्रासह दरोडा टाकण्यासाठी येणार आहेत.

अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन त्यांचे परवानगीने
युनिट-१, गुन्हे शाखा, पथकाकडील कर्मचारी यांनी सापळा ला वला असता
दोन दुचाकीवर पाच इसम आले व त्यांनी आपली दुचाकी वाहने प्लॅटीनम बिल्डींग मंगळवार पेठ रोडचे कडेला
पार्क करुन तेथे उभे असलेल्या वॉटर टँकरच्या आडबाजुस संशयीतरित्या एकत्र जमुन आपसात चर्चा करीत असताना
दिसले छापा टाकुन सदर इसमांना जागीच पकडुन व त्यांना आहे त्या स्थितीत थांबण्यास सांगुन त्यांना त्यांचे नाव पत्ता
विचारता त्यांनी आपली नावे १) निखील दत्ता थोरात वय २४ वर्षे रा. वाघोली,पुणे. २) रवि ज्ञानेश्वर बोत्रे वय २४ वर्षे
रा. कोथरुड,पुणे. ३) किरण ज्ञानेश्वर बोत्रे वय २२ वर्षे रा. सदर ४) अविनाश राजेंद्र कांबळे वय २२ वर्षे रा. सदर
५) राहुल म्हसू शिंदे वय २४ वर्षे रा. मुंपो लोणी ता. परांडा जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितली त्यांच्या
झडती घेता २ कोयते, ५ मोबाईल, २ दुचाकी असा माल जप्त करुन त्यांना जेरबंद केले

आरोपी यांच्याविरुध्द १ चतुश्रृंगी, २ चंदननगर, २ भारती विद्यापीठ, ४ कोथरुड, १ उत्तमनगर, १
हिजवडी, १ परांडा (उस्मानाबाद), १ नळदुर्ग प्रमाणे इत्यादी पोलीस ठाणेत घरफोडी,चोरी,जबरी चोरी,दुखःपत,गर्दी मारामारी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

यातील आरोपी निखील दत्ता थोरात व किरण ज्ञानेश्वर बोत्रे हे हिजंवडी पोलीस ठाणेत दाखल असलेल्या घरफोडी गुन्हयात २०१९ पासून फरारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपीकडे अधिक तपास करता त्यांनी २ फरासखाना, २ लोणीकंद, १ हिजवडी पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले असून त्यांच्याकडून ०४ एलसीडी टिव्ही, ०४ लॅपटॉप, ०२ इंस्त्री, बुट व रोख रक्कम असा एकुण ३.२६,०००/- रुपयांचा माल व वरील मुद्देमाल असा एकुण रुपये-४,८२,०००/- चा माल हस्तगतकेलेला आहे

. वरील आरोपी विरुध्द पोलीस अंमलदार अजय थोरात यांनी समर्थ पोलीस ठाणेत फिर्याद दिली असुन
गुन्हा नोंद केला आहे

. आरोपी कडुन एकुण ५ घरफोडीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.

अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक श्री संजय गायकवाड युनिट-१,गुन्हे शाखा हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री अशोक मोराळे,अपर पोलीस आयुक्त,पुणे शहर,मा.श्री बच्चनसिंग पोलीस उप-
आयुक्त,गुन्हे,पुणे शहर, मा.श्री सुरेंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे-१,पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ
पोलीस निरीक्षक श्री सुनिल ताकवले, पोलीस उप-निरीक्षक श्री संजय गायकवाड,पोलीस उप-निरीक्षक श्री सुनिल
कुलकर्णी पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, शशीकांत दरेकर, प्रशांत
गायकवाड, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, सतिश भालेकर, अशोक माने, योगेश जगताप, सचिन जाधव, दत्ता
सोनावणे यांच्या पथकाने केली.

Latest News