प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी ना मोफत कोरोनाची लस द्या : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई |केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेसाठी अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढी मोठी तरतूद केलेली असताना सामान्य नागरिकांकडून लसीकरणासाठी 250 रुपये आकारण्याची गरज काय?, . त्यासाठी 250 रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहेत. यावरून काँग्रसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना (आयुष्मान-भारत) मोफत कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार केली

सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी 35 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील आणि 75 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल. म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणं शक्य आहे, असं असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे?,

म्हणाले.दरम्यान, अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी त्या देशांमध्ये असलेल्या विमा योजन आणि अर्थसंकल्पीय तरतुदीचा आधार घेतला जात आहे.  काेराेना लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला हाेता. आता दुसरा टप्पा साेमवार 1 मार्चपासून सुरू झाला आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेले नागरिक खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात