पुण्यातअनेक सेवा पुढील 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

पुणे |सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे. पुण्यातील PMPML बससेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसंच आठवडे बाजारही बंद राहणार आहे, असं सौरभ राव यांनी सांगितलं आहे.पुण्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काही बंधने लागू करण्यात आली आहे. तसेच अनेक सेवा पुढील सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत नव्या निर्बधांसंदर्भात माहिती दिली.

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. तसंच धार्मिक स्थळं देखील पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील, अशी माहिती सौरभ राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. तसंच शहरातील शाळा महाविद्यालय 30 एप्रिल बंद राहणार आहेत, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली आहे.