कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आठ जिल्ह्यामध्ये निर्बंध…

मुंबई: कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचं काम सुरु आहे. बेड्स, मेडीसम, ऑक्सिजन याबाबत चर्चा सुरु आहे. कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही तर अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत चर्चा झाली. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे.पुणे ,मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे

.लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालये वर्क फ्रॉम होम केले आहेत. नाईट कर्फ्यू लावले आहेत. निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत बारकारने निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज हा लॉकडाऊन असतो. लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत.

तोंडातल्या शिंतोड्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे नियम पाळलं तर परिस्थिती नियंत्रणात येईल. लोकांनी अंगावर घेऊ नये. लगेच टेस्ट केली नाही तर तरुणांनाही ऑक्सिनज बेड्सची गरज लागत आहे. लक्षणे दिसली की तातडीने टेस्ट करावे. ज्यांना बेड्सची आवश्यकता नाही त्यांनी आयसीयूचा बेड घेऊ नये. याबाबतच्या सूचना बैठकीत आम्ही देतोय. सगळ्या संसाधनाचा व्यवस्थित पुरवठा व्हावा त्याबाबत चर्चा सुरु आहे

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी बंद ठेवायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाने चालत होते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर अहवाल आणून निर्णय घेण्याचं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पुण्यात जो निर्णय झाला तो वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला. पुण्यात निर्बंध लावणं गरजेचं होतं. पण तसे सर्वदूर लावले असं नाही. कोणत्या जिल्ह्यात निर्बंध लावले पाहिजेत, तेही महत्त्वाचं आहे. देशातील टॉप आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पुणे ,मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे.  लोकलबाबतही आढावा घेतलेला आहे. त्याही बाबतही काही गाईडलाईन्स जाहीर होतील. कसं राहावं याबाबत सूचना दिल्याल जातील. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग टाळावे. महाराष्ट्रात आरोग्याची व्यवस्था ठीक आहे. काही उणिवा आहेत. त्याबाबतच निर्णय घेतला जातोय.