आयुर्वेदिक औषधामुळे कोरोनावर उपाय पुण्यात डॉ फडके यांचा दावा…

fas

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला असून हा आकडा यापुढेही वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता लागू करण्यात आला आहे. पुण्यात लसीकरणावरही भर दिला जात आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, पुण्यात मिनी लॉकडाऊनदुसरीकडे पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा कोथरुड येथील डॉ. सारंग फडके यांनी केला आहे.हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे.

डॉ. सारंग फडके यांनी कोरोनावर एका नावाने आयुर्वेदिक औषध तयार केलं आहे. या औषधामुळे कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय होत असल्याचा त्यांचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिले असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे.1 वर्षांच्या मुलापासून 78 वर्षांच्या पेंशटला हे औषध देण्यात आले आहे. या औषधाला मान्यता मिळावी म्हणून डॉ. फडके हे गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप केंद्राने त्यांची दखल घेतली नाही

.त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.डॉक्टर सारंग फडके यांनी हा दावा जरी केला असला, तरी कोणत्याही औषधाला सहजासहजी परवानगी मिळत नाही. कोरोनासारख्या जगभरात थैमान घालणाऱ्या आजारावर जगभरात औषध शोधले जात आहेत. हा संसर्ग पसरल्यानंतर जवळपास वर्षभराने भारतात लस उपलब्ध झाली. त्यामुळे डॉ. सारंग फडके यांच्या औषधाची वैद्यकीय पडताळणी किंवा तत्सम चाचण्या कशा होणार, कोण करणार हा प्रश्न आहे.

Pune Dr Sarang Phadke

Latest News