लंडनच्या पुलावर Resign Modi बॅनर…

लंडन – बॅनरवर Resign Modi असं लिहिण्यात आलं आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून बॅनरवर भारताचा स्वतंत्र्य दिन असंही लिहिलेलं आहे. भारतात अल्पसंख्यांक आणि दलितांविरुद्ध हिंसा होत असल्याचं बॅनर लावणाऱ्या लोकांनी म्हटलं आहे.लंडनमध्ये अनिवासी भारतीयांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या संदर्भाती बॅनर एका पुलावर झळकलं आहे. लंडनच्या वेस्टमिन्टर ब्रीजवरुन भारतीय नागरिकांना मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

देश ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरून मुख्य सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्याचवेळीस्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सेलिब्रेशनचे औचित्य साधूनच अनिवासी भारतीयांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.