अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची चर्चा

पुणे : अफगाण सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते पाकिस्तानला पळून गेले आहेत. राष्ट्रपतींना सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेचे हेलिकॉप्टर्सही पोहोचली होती असंही सांगितलं जात आहे. अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर आता राष्ट्रपतीपदाची सूत्र कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

तालिबानी कमांडर अब्दुल गनी बरादर नवे राष्ट्रपती होऊ शकतात अशी चर्चा आहे. तिथे सध्या सुरू असलेल्या वादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव आहे. शांततेत सत्ताबदल करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. तालिबानी आणि अफगाण सरकार प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, विविध देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षिततस्थळी हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 129 भारतीय नागरिकांना दिल्लीमध्ये सुरक्षित आणण्याची मोहीम राबवली जात आहे.

अफगाणिस्तानने तालिबानसमोर पराभव स्वीकारला असून आपली नांगी टाकली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. इतकच नाही तर टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती मिळाली आहे.

भारतानं काबूलमधील दुतावास अद्याप बंद केलेला नाही. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नियोजन करत असल्याची माहिती भारतीय दुतावासातील सूत्रांनी दिली आहे. अफगाणिस्तानात तालिबान युगाची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान सरकारला तालिबानने नमवले आहे. टोलो न्यूजनुसार, देशाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सत्ता हस्तांतरणानंतर देश सोडला आहे. ते ताजिकिस्तानला रवाना झाले आहेत.

100 पेक्षा जास्त दिवसांच्या संघर्षानंतर तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. काबूल ताब्यात घेतल्यानंतर असे मानले जात होते की, घनी सरकारने तालिबानपुढे शरणागती पत्करली आहे. यानंतर सत्ता सोपवण्याची संपूर्ण प्रक्रिया रविवारी पार पडली. यापूर्वी तालिबानच्या वतीने असे म्हटले होते की, त्यांना शांततेच्या मार्गाने चर्चेद्वारे तोडगा हवा आहे. देशातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही.

तालिबानचा क्रमांक दोनचा नेता मुल्ला बरादर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी सत्ता हस्तांतरणासाठी बोलणी करण्यासाठी आला होता. असे सांगितले जात आहे की, अली अहमद जलाली हे अफगाणिस्तानचे पुढील राष्ट्रपती असू शकतात. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे

तालिबानला अफगाणिस्तानमध्ये पुढील काही दिवसांत शांततेने सत्ता हस्तांतरित करायची आहे.’ काबूलचा पाडाव झाल्यानंतर अफगाणिस्तानातून तालिबानच्या भीतीने मोठ्या संख्येने नागरिकांनी पलायन सुरू केले आहे. तालिबानी फौज कलाकन, काराबाग आणि पगमन जिल्ह्यात आहेत.

अतिरेक्यांनी यापूर्वी जलालाबादवर कब्जा केला होता. काबुलमध्ये मधून मधून गोळीबाराचा आवाजात येत होता. तालिबानने काबूलला लष्करी कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते शांततेने सत्ता हस्तांतरणाची वाट पाहत आहेत.

तालिबानने म्हटले की, “कोणाच्याही जिवाची, मालमत्तेची, सन्मानाची हानी होणार नाही आणि काबूलच्या नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही.” काबूलव्यतिरिक्त, जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबानच्या ताब्यातून वाचलेले होते. हे शहर पाकिस्तानच्या मुख्य सीमेजवळ आहे.