महिलांच्या सुरक्षेवरुन राष्ट्रीय महिला आयोगानं ठाकरे सरकारला फटकारलं

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या महिला पिडितेच्या कुटुंबीयांची महिला आयोगानं घरी जाऊन भेट घेतली.साकानाकी परिसरात घडलेल्या प्रकरणामुळे सध्या देशाचं वातावरण पेटून उठलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच महिलांच्या सुरक्षेवरुन राष्ट्रीय महिला आयोगानं ठाकरे सरकारला फटकारलं आहे.

कोणतीही घटना घडली की पीडित महिला ती राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. अशी कोणतीही संस्था नाही की जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील किंवा काही घडलं तर त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी जाऊ शकतील. आम्हाला हे कळत नाही की सरकार इतके असंवेदनशील कसं आहे की, त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही, असं महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटलंय.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सगळी माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल.

Latest News