पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कामांच्या प्रगतीत अग्रेसर: आयुक्त राजेश पाटील
तिस-या टप्प्यात निवड होवूनही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विकास कामांच्या प्रगतीत अग्रेसर
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांची माहिती
पिंपरी चिंचवड :- केंद्र शासनामार्फत स्मार्ट सिटी प्रकल्प १०० शहरांमध्ये तिस-या टप्प्यात निवड होताना शहर ६९ व्या स्थानी होते. तथापि, कामकाजाच्या प्रगतीनुसार पिंपरी चिंचवड शहर सद्यस्थितीत २७ व्या स्थानावर असून राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड ने दुस-या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.
तसेच, केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळविण्यात देखील पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अग्रेसर राहीली आहे. त्याचबरोबर, केंद्र शासनाकडून आयोजित सायकल फॉर चेंज या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला र.रु. १ कोटीचे पारितोषिक मिळाले असून स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कामकाजाकरीता केंद्र शासन, राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.
स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण २७० ठिकाणी City Wi-fi बसविण्यात आलेले असून त्यापैकी १२४ ठिकाणी Wi-fi बसविण्यात आले आहेत. मनपा मुख्य इमारत, सर्व क्षेत्रिय कार्यालये, मनपा हॉस्पीटल, गार्डन तसेच आयसीसीसी आदी ठिकाणी जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच,
एकूण ८५० ठिकाणी सीसीटीव्हीसाठी Poles उभारण्याचे काम सूरू आहे. त्यापैकी ६५८ Poles उभारण्यात आलेले असून काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 1252 कॅमेरे (फिक्स्ड, पीटीझेड आणि डोम) City Surveillance (CCTV) अंतर्गत बसविण्यात येणार आहेत
सदर रस्ते विकास कामांमध्ये ४२ रस्त्यांची निवड करण्यात आलेली होती. परंतु, स्थानिक अडचणींमुळे पिंपळे सौदागर येथील २ रस्ते रदद करण्यात आलेले असून ४० रस्त्यांचे विकास कामे सद्या सुरु आहेत. तर, ३ रस्ते विना फुटपाथ आहेत.
तसेच, जिजामाता उद्यानाचे काम पूर्ण झालेले आहे. देवकर पार्क ते जुनी सांगवी एसटीपी पर्यंत नदीपात्रातून २९५० मीटर पैकी २८५० मीटर (River Interceptor) काम पुर्ण झालेले आहे. पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर याठिकाणी एकूण १० स्मार्ट टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन्ही ठिकाणी ४ स्मार्ट टॉयलेटचे काम प्रगतीपथावर असून संपूर्ण १० ठिकाणी नोव्हेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे
. स्मार्ट सिटी आराखडयानुसार पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या भागात एकुण ४९ बस स्टॉप उभारण्यात येणार असून सद्यस्थितीत एकूण ९ स्मार्ट बस स्टॉपचे काम प्रगती पथावर असून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण स्मार्ट बस स्टॉपचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर, योगा पार्क मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल. यासह स्मार्ट रस्त्यांना जोडणा-या ४१ जंक्शन चे काम पूर्ण करण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सेव्हरेज लाईन आणि वॉटर सप्लाय लाईन, रस्त्यांच्या कडेला इलेक्ट्रीक पोल, रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड, रस्त्यांच्या कडेला लहान गार्डन, उद्यानांचा विकास, पार्किंग सुविधा आदी कामांचा या प्रकल्पात समावेश आहे.
सिटी नेटवर्क City network भविष्यातील उत्पन्नाचा स्त्रोत : – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये एकूण ५८५ किमी अंतराचे Optical fiber Network चे जाळे टाकण्यात येत आहे. भविष्यात हा प्रकल्प स्मार्ट सिटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन होणार आहे. यापुढे शहरात खासगी कंपन्यांना केबल टाकण्यास मनाई करून सिटी नेटवर्कच्या माध्यमातून सदर कंपन्यांची यंत्रंणा जोडली जाणार आहे. नागरिकांना होणार रस्ते खोदाईच्या त्रास कमी होवून महापालिकेच्या अनावश्यक खर्चास आळा बसणार आहे.
, असेही महानगरपालिका आयुक्त् तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी माहिती देताना सांगितले.