‘जुन्या इमारतींचा पुनर्विकास ‘ परिसंवादाला चांगला प्रतिसाद ………… ‘रिडेव्हलपमेंट फेस्टिवल’ला प्रारंभ

पुणे :
पुणे शहरातील मध्यवस्तीतील जुन्या झालेल्या वास्तू, लिफ्ट – पार्किंग सारख्या नसलेल्या सुविधा, राहण्याची कमी जागा… यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा (रिडेव्हलपमेंट) पर्याय गेल्या काही वर्षांत समोर आला आहे.पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया, पर्याय, अडचणी, शासकीय नियमावली, मिळणारा एफएसआय अशा अनेक कळीच्या मुद्दयांवर मंथन करण्यासाठी आयोजित ‘ रिडेव्हलपमेंट फेस्टिव्हल ‘ ला शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला.
या निमित्ताने आयोजित परिसंवादाला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावर सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे .
पाहुण्यांचे स्वागत फेस्टिव्हलचे संयोजक राजेंद्र आवटे, गणेश जाधव,मकरंद केळकर यांनी केले. अनघा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
या फेस्टिवलमध्ये 26 नोव्हेंबर शुक्रवार, पहिल्या दिवशी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ‘पुनर्विकासा समोरील आव्हाने आणि संधी ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन ,कायदेतज्ञ ऍड .वसंत कर्जतकर, आर्किटेक्ट हर्षल कवडीकर, मिलिंद देशपांडे हे या परिसंवादात सहभागी झाले . मिलिंद देशपांडे यांनी मान्यवरांशी संवाद साधला.
परिसंवादात बोलताना हर्षल कवडीकर म्हणाले, ‘ नव्या जागेवर प्रकल्पापेक्षा पुनर्विकास करणे विकसकांना अधिक सोयीचे आहे.आर्किटेक्ट म्हणून विचार करताना डेव्हलपर्सच्या ऑफर्समधून निर्णय घेताना कोणीतरी त्रयस्थपणे, अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. रहिवाशांमध्ये जागरुकता वाढली आहे. सोसायट्यांनी स्वतंत्र सल्लागार नेमणे आवश्यक आहे. युनिफाईड डीसी रुल मुळे अपेक्षा वाढल्या आहेत.वाढीव अपेक्षामुळे प्रकल्प पुढे अडकू नये याची काळजी घेतली पाहिजे.
अॅड.कर्जतकर म्हणाले, ‘ सोसायटीमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. कायद्यातील तरतुदी स्पष्ट असल्याने त्यानुसार प्रक्रिया केली पाहिजे.पारदर्शकता असेल तर एखाद्या अडवणाऱ्या सभासद हा अडथळा ठरत नाही.एखाद्या कुटुंबात वारसा बद्दल वाद असतील त्यावरही कायदेशीर उपाय आहेत.विकसकाशी करार करताना तो स्वयं स्पष्ट असावा.
सुहास पटवर्धन म्हणाले, ‘ सोसायट्यांनी स्वतः जमिन विकत घेऊन गृहनिर्माण प्रकल्प उभारलेला असल्याने पुनर्विकसन हा हक्क आहे. कायदेशीर प्रक्रिया पालन करुन हा हक्क प्रत्यक्षात आणला पाहिजे. काही सभासदांनी विविध सुविधा तयार केलेल्या असतात, पुनर्विकास करताना सहजीवनाचा विचार करुन सामंजस्याने निर्णय घेतला पाहिजे. या प्रक्रियेत समुपदेशन उपयोगी पडते. पुढच्या पिढीशी संवाद ठेवला पाहिजे.
शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ‘गृहबांधणी हरित संकल्पनांची गरज ‘ या विषयावर चर्चा होईल. यामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ, इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल ( आय जी बी सी ) पुणे चॅप्टर चे अध्यक्ष जे.पी. श्रॉफ यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ‘सुह्रद’ या गृहप्रकल्पाच्या अॅम्फी थिएटर मध्ये ‘घर संकल्पनेला अनुसरून काव्य ,संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
इमारतींची टेरेस धूळ खात पडून न राहता तेथे सांस्कृतिक कट्टे, वाय फाय झोन, टेरेस गार्डन अशा सुविधा निर्माण कराव्यात असा गंगोत्री होम्सचा आग्रह आहे. ‘ सुह्रद खुला मंच ‘ याच संकल्पनेतून तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन रविवारी अभिनेते मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
घर आणि नात्यांवर आधारित डॉ. माधवी वैद्य निर्मित ‘रंग संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे. शर्वरी जमेनीस, धीरेश जोशी त्यात सहभागी होणार आहेत.
गृहबांधणी विषयक प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 पासून सुरू असणार आहे ,