नवी सोच, नवा पंजाब – प्रियंका गांधी


पंजाब: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पार्टी जोरदार प्रचार आणि एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी कोटकपुरा येथे ‘नवी सोच, नवा पंजाब’ या रॅलीत मार्गदर्शन करताना काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “आम आदमी पार्टी ही हिंदुत्ववादी असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केली आहे”.प्रियंका गांधी म्हणाल्या की, “पंजाब सरकार हे पंजाबमधून चालवली जायला पाहिजे, दिल्लीतून नाही.म्हणाल्या की, “पंजाब सरकार हे पंजाबमधून चालवली जायला पाहिजे, दिल्लीतून नाही.
कोटकपुराचे काॅंग्रेस उमेदवार अजयपाल सिंह संधू यांच्या प्रचारादरम्यान बाेलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांच्या नावावर काहीही नाही. आम आदमी पार्टी आरएसएसने निर्माण केलेली आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबाबत जाणून घेणं महत्वाचं आहे. आपने सांगितलं की, दिल्ली माॅडेल पंजाबमध्ये आणू; पण हे विसरू नका २०१४ मध्ये भाजपाने गुजरात माॅडेल आणून लोकांना मूर्ख बनविण्यात आलं आहे”, अशीही टीका प्रियंका गांधी यांनी केली
भाजपाची किंवा आपची सरकार दिल्लीतून चालवली जाते तशी नाही. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी हे तुमच्यातीलच एक आम आदमी आहेत. शेतकरी आंदोलनात कित्येक शेतकऱ्यांचा जीव गेला; पण तुम्ही हार मानली नाही. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, मी एक पंजाबी व्यक्तीशी विवाह केला आहे. माझ्या मुलांचं रक्त पंजाबी आहे. पंजाबी लोक बहादूर असतात.”