एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल…खासदार असुद्दीन ओवैसी


हिजाब परिधान करु, कॉलेजला जाऊ, डॉक्टरही बनणार, जिल्हाधिकारी ही बनणार, उद्योजक ही बनणार, आणि याद राखा की मी कदाचित जिवंत नसेल, तुम्ही पाहाल की एक दिवस हिजाब घातलेली महिला या देशाची पंतप्रधान होईल”, असं ओवैसी म्हणाले. ते एका सभेला संबोधित करत होते. यावेळेस त्यांनी हे विधान केलं
देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये हिजाबवरुन वाद पेटला आहे. या मुद्द्यावरुन अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या मुद्द्यावरुन एमआयएमचे सर्वेसर्वा आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
एका दिवशी हिजाबी पंतप्रधान होईल, असं विधान ओवैसी यांनी केलं आहे. याबाबतचा व्हीडिओ ओवैसींनी ट्विट केला आहे. दरम्यान सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक हा वाद पेटवत आहे, असंही म्हटलं जात आहे
. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान कर्नाटकमधील हिजाब वादाच्या निषेधार्थ रविवारी मुंब्रा भागात आंदोलन करण्यात आलं. मुस्लीम समाजातील महिला आणि तरुणी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या. हिजाब हा आमचा अधिकार आहे, हिजाब आमची इज्जत आहे, असं सांगत मुस्लीम महिलांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.