हॉटेल उद्योगात इंटर्नशिप साठी नवनविन संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : सचिन शेंडगे विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनीचे वाकड येथे पुणे कार्यालय सुरु


हॉटेल उद्योगात इंटर्नशिप साठी नवनविन संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : सचिन शेंडगे
विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनीचे वाकड येथे पुणे कार्यालय सुरु
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) जागतिकीकरणाच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक उद्योग व्यवसायांना चालना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही देशात परदेशात अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत. या उद्योग व्यवसायांना पूरक ठरणा-या हॉटेल उद्योगात देखिल लाखो इंटर्नशिपसाठी नवनविन संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनी २००८ सालापासून कार्यरत आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे असून परदेशात यूएसए, मलेशिया, फ्रान्स आणि गोवा, नवी मुंबईत, पुण्यात कार्यालये आहेत. कंपनीच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत पाच हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना देशातील प्रमुख उद्योग, व्यवसायात इंटर्नशीपसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच यूएसए, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपसह जगभरातील अनेक देशांमध्ये बाराशेंहून जास्त विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसा त्या विद्यापीठांशी सांमजस्य करार करण्यात आला आहे.
आता वाकड येथिल नवीन शाखेच्या माध्यमातूनही आणखी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेंडगे यांनी केले.