महापालिकेतील चुकीच्या कामांची कायदेशीर मार्गाने चौकशी होईल- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आली. मोशीतील गणेश बॅक्वेट हॉल येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह, जोष आहे. येणा-या निवडणुकीत महापालिका 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची होईल, याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कामकाज होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत”.परी-चिंचवड महापालिकेत बोगस बँक गँरटीसह भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे झाली आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी हळूहळू लोकांच्या पुढे येतील. आम्ही मुद्दामहून कोणाला अडचणीत आणणार नाही. सूड उगवणार नाही. सुडाचे राजकारण करणार नाही. पण, महापालिकेतील चुकीच्या कामांची कायदेशीर मार्गाने चौकशी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.”महापालिका निवडणुकीसाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्यास, महाविकासआघाडी करण्यास राष्ट्रवादीचे प्राधान्य आहे. तीनही पक्षातील स्थानिक पदाधिका-यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. घटक पक्षांकडून अवास्तव मागण्या आल्या. तर, आघाडी व्हायला अडचण होईल. पण, त्याला आणखी वेळ असल्याचे” पाटील यांनी सांगितले.शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.