युक्रेनच्या आक्रमणावर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क परिषदच्या बैठकीत भारत गैरहजर

नवीदिल्ली: सुरक्षा परिषद आणि सर्वसाधरण सभा अशा दोन्हींमध्ये भारताने गैरहजेरी नोंदवत रशियाला एक प्रकारे सहकार्य केले होते.शियाने केलेल्या युक्रेनच्या आक्रमणावर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क परिषदच्या बैठकीत मतदानावेळी भारत गैरहजर राहिला. रशियाने केलेल्या या आक्रमणाची चौकशी करण्यासाठी तातडीने आयोग नेमण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती.सुरक्षा परिषद आणि सर्वसाधरण सभा अशा दोन्हींमध्ये भारताने गैरहजेरी नोंदवत रशियाला एक प्रकारे सहकार्य केले होते.शियाने केलेल्या युक्रेनच्या आक्रमणावर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क परिषदच्या बैठकीत मतदानावेळी भारत गैरहजर राहिला. रशियाने केलेल्या या आक्रमणाची चौकशी करण्यासाठी तातडीने आयोग नेमण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती.

परिषदेत एकूण ४७ सदस्य राष्ट्र आहेत. यामध्ये ३२ देशांनी हा आयोग स्थापन करण्याच्या बाजूने मतदान केले. तर रशिया आणि इरिट्रिया या देशांनी विरोधात मतदान केले. तर भारत, चीन, पाकिस्तान, सुदान, व्हेनेझुएला हे देश मतदानासाठी गैरहजर राहिले.फ्रान्स, जपान, नेपाळ, युएई आणि इंग्लंड आणि अमेरिका आदी राष्ट्रांनी आयोग स्थापन्याच्या बाजूने मतदान केले.
परिषदेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,”मानवी हक्क परिषदेने तातडीने आंतरराष्ट्रीय आयोग स्थापून रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची चौकशी केली जाणार आहे.”भारताने यापूर्वी दोन वेळा युक्रेन संदर्भातील ठरवांवेळी गैरहजेरी नोंदवली होती.

Latest News