भाजप, मनसे पक्षाचं हिंदुत्व बोगस, -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई– भाजप आणि मनसे पक्षाचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे लोकांना दाखवून द्या, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. भाजप आणि मनसेकडून होत असलेल्या हिंदुत्वाच्या कोंडीवरून त्यांनी त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. आज खासदारांना दोन्ही पक्षावर तुटून पडण्याचा आदेश दिल्यानंतर उद्या (ता.३०) शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतही तोच आदेश देण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कडक आदेश दिला आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांशी चर्चा केली. चर्चेचा केंद्रबिंदू अर्थातच भाजप आणि मनसे होता.या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पक्ष प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडा, असा आदेशच दिला आहे
. त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेत बाबरी मशीद पडली तेव्हा राज कुठे होते ? अशी विचारणा बैठकीत केली. भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर चोख प्रत्यूत्तर द्या, तसेच सरकारने केलेली कामे लोकांपर्यत पोहोचवा असा आदेशही त्यांनी पक्षाच्या खासदारांशी बोलताना दिला. भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
तसेच हाच धागा पकडत ते १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री यांनी देखिल जाहीर सभा घेऊन विरोधकांना उत्तर देण्याचे जाहीर केल्यानंतर ते देखिल औरगाबाद येथे राज ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्याच ठिकाणावरुन उद्धव ठाकरे देखील विरोधकांवर कडाडणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याचा इशारा दिला आहे. तसेच ३ मे पर्यंत हे भोंगे हटले नाहीत तर मशिदी समोर हनुमान चालिसा म्हणणारे भोंगे वाजवू असा इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्याच्या गृह मंत्रालायाने देखील राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला गांभिर्याने घेतलेले आहे.भोंग्यावरुन आणि राणा दाम्पत्यांनी मुंबईत केलेल्या स्टंटबाजीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर जाहीर सभा घेऊन विरोधकांना उत्तर देऊ असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १ मे रोजीच पुणे येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच आठवडाभरात राज ठाकरे हे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार आहेत. तेथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत.