केतकी चितळे ला सात जून पर्यंत न्यायालयीन कोठडी….


मुंबई |
केतकी चितळे ला 7 जून पर्यंत ठाणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अॅट्रॉसिटी गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालईन कोठडी सुनावली आहे.केतकी चितळेलाही विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यांप्रकरणी राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत पोस्ट करत खळबळ माजविली होती. त्यांनतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ माजला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्या आहेत. ठाणे न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे