किरीट, जब तक गब्बर ऊपर बैठा है..तब तक नाच ले, जितना नाचना है फिर, तेरा क्या सांबा? सोच ले जरा.. NCP महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण


पिंपरी :नव्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सोमय्यांवर काल हल्लाबोल केला. त्यांची तुलना त्यांनी शोले चित्रपटातील सांबाशी, तर नाव न घेता गब्बरची पंतप्रधान मोदींशी केली.१९७५ मध्ये आलेल्या शोले या सुपरहिट हिंदी चित्रपटातील “अब,तेरा क्या होगा कालिया,” हा गब्बरसिंगचा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्या धर्तीवरच चव्हाण यांनी काल ट्विट करीत सोमय्या यांना लक्ष्य केलं.मात्र, त्यानंतर त्या स्वतःही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या. त्यांच्यावरही वैयक्तिक टिकाटिपण्णी केली गेली
भाजपचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार यांची राज्यातील महाविकास आघाडीविरोधात मोहीम सुरुच आहे. दररोज ते नवनवीन आरोप करीत आहेत. त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवार कूटुंब त्यांच्या निशाण्यावर आहेत.
त्यावरून केंद्रात सध्या भाजपची सत्ता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,तर गृहमंत्री अमित शहा आहेत. केंद्रानेच सोमय्या यांना झेड सुरक्षा दिली आहे. या जोरावरच त्यांनी मविआ सरकार व त्यातही राष्ट्रवादीविरुद्ध आरोपांची राळ उडवून दिली आहे
. त्यातून दोन कॅबिनेट मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले असून इतर काही मंत्र्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणामार्फत कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. हे लक्षात घेऊन चव्हाण यांनी काल ट्विटव्दारे सोमय्यांवर हल्लाबोल केला. त्यातून त्यांनी केंद्रातून भाजपची सत्ता,त्यांनी दिलेली सुरक्षाव्यवस्था व मोदींचा वरदहस्त गेल्यावर काय होईल,असा सूचक इशारा सोमय्यांना दिला आहे.