क्रॉस व्होटिंग: राजस्थानातील भाजपा आमदार शोभाराणी कुशवाह यांची हकालपट्टी….


“तुम्हाला पक्षातून तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच पक्षाने दिलेल्या इतर जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात येत आहे. शोभाराणी कुशवाह यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करण्यात येत आहे, असे या पत्रात म्हटले आहे. निवडणूकीनंतर १० जून रोजी पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १९ जूनपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं. पण शोभाराणी कुशवाह यांनी केंद्रीय शिस्तपालन समितीकडे स्पष्टीकरण त्यांच स्पष्टीकरण सादर न करता ११ जून रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करत पक्ष नेतृत्वावर सार्वजनिकरित्या आरोप केले. त्यामुळे पक्षाने त्यांची तातडीने हकालपट्टी केली आहे
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याने आमदार शोभाराणी कुशवाह यांची हकालपट्टी केली आहे. शोभाराणी या राजस्थानातील ढोलपूर मतदार संघाच्या आमदार आहेत.त्यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याची बाब लक्षात आल्याने पक्षाने त्यांच्यावर ही कारवाई केली
भाजपाचे केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी आमदार शोभाराणी कुशवाह यांना पत्र पाठवून त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती दिली आहे.शोभाराणी यांना राज्यसभा निवडणुकीत भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुभाष चंद्र यांना मत देण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना क्रॉस व्होटिंग केलं. शोभाराणी यांच्या क्रॉसवोटींगमुळे सुभाष चंद्र यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानच्या या निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी राज्यसभेवर निवडून गेले
. यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेते घनश्याम तिवारी राजस्थानतून वरिष्ठ सभागृहात निवडून आले.काही दिवसांपूर्वी शोभाराणी कुशवाह यांनी पक्षावर गंभीर आरोप करत भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. शोभाराणी यांनी भाजपच्या बड्या नेत्यांवर आश्वासन भंगाचा आरोपही केला होता. आपण धौलपूरमधून तीनवेळा निवडणूक जिंकली. मी चौथ्यांदा निवडणूक जिंकली तर राजकारणात माझी उंची वाढेल, त्यामुळे मला २०२३ च्या निवडणुकीतून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.