25-30 हजारांचे मताधिक्याने माझा विजय होईल….हेमंत रासने


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मागील १५-२० दिवस निवडणुकीत आम्ही जोरदार प्रचार केला आहे. आमची भाजप – शिवसेना – आरपीआय व घटक पक्षांची युती मतदारसंघात कार्यरत होती. आम्ही इथल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहचलो. केंद्राची व राज्य सरकारची विकासाम आम्ही शेवटच्या माणसांपर्यंत पोहचलो. केंद्र आणि राज्य सरकार विकासकामे पाहून इथली जनतेचा आशिर्वाद आम्हालाच मिळणार आहे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या २ मार्च रोजी निकाल येणार आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप विरूद्ध यांची थेट लढत आहे. दरम्यान काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेच्या एक्झिट पोलनुसार कसबामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवडमध्ये भाजपच्याअश्विनी जगताप (Ashwini Jagtap) निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला रासने पुढे म्हणाले, “चांगलं मताधिक्य मला मिळेल. साधारण 25-30 हजारांचे मताधिक्याने माझा विजय होईल. आम्ही बूथपर्यंत पोहचून कामाला सुरूवात केली होती. कोणत्या भागात किती मतदान झाले, आमच्या पारंपरिक मतरांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले आहे. विजयाचे बॅनर लागल्याने, अनेकांचे फोन सुरू झाले होते. मात्र जेव्हा निकाल जाहीर होईल, तेव्हाच बॅनर लावायला हवेत