काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी दानिश अली यांची चर्चा..


नवी दिल्ली – भाजप खासदार बिधुरी यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर मी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतो.लोकसभेत गुरुवारी चांद्रयान-३ मिशनवरील चर्चेदरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावरून विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेऊन चर्चा केली
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी चंद्रयान-3 च्या यशावर बोलत होते. त्याचवेळी बसपा खासदार दानिश अली यांनी काहीतरी टिप्पणी केली. यावर रमेश बिधुरी संतापले.
कार्यवाही सुरू असताना ‘तो अतिरेकी आहे, तो एक अतिरेकी आहे, तो एक अतिरेकी आहे, तो एक दहशतवादी आहे’ अस म्हणताना रमेश बिधुरी दिसत आहेत
दरम्यान बिधुरी यांची टिप्पणी कामकाजातून काढून टाकण्यात आले आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर दानिश अली यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळले. त्यांना प्रतिक्रिया देणे देखील जड जात होते. ते म्हणाले, लोकसभेत अपमान झाल्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही.
या सर्व घाडमोडीनंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो राहुल यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ‘नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान’