धक्कादायक: ड्रेसवर असणाऱ्या पोलीस वर कोयता मारून हल्ला होतो?

poli

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हेगाराने कोयत्याने वार केला त्या निमित्ताने:-ही हिम्मत का वाढली याचा सुदधा खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नाहीतर आज घटना घडली तेवढ्या पुरता विचार झाला तर गुन्हेगार आपली हिम्मत अजून वाढवणार आहे हे सत्य आहे. विचार जर केला तर एका ड्रेसवर असणाऱ्या पोलीस वर कोयता मारून हल्ला होतो.मी म्हणतो ते साहेब आहेत असे मी म्हणणार नाही.कारण सामान्य माणसाला फक्त खाकी ड्रेस वरील जो व्यक्ती आहे त्याची भीती असणे अपेक्षित आहे.पण तसे होत नाही.याचा मागे काही वर्षा पूर्वी जाऊन विचार होणे अपेक्षित आहे.पोलीस ही यंत्रणा मुळात का निर्माण केली तर सरकारे टिकावी आणि सरकारचे जे काही निर्णय जनतेसाठी आहेत त्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी?मग एवढ्या उदात्त विचाराने पोलीस यंत्रणा निर्माण झालेली असेल तर त्या यंत्रणेला कडक ठेवण्या ऐवजी ती समाजसेवी यंत्रणा बनवण्या पर्यंत तिचा आलेख खाली का आला?ज्या एक पोलिसाला ड्रेस वर बघितल्यावर गुंड किंवा वाईट काम करणारा व्यक्ती लपुन बसत असे किंवा पळून जात असे तोच व्यक्ती आज छाती काढून उलटा प्रश्न विचारतो?किंवा एखाद्या संविधानिक अधिकाराचा धाक दाखवतो,हे कितपत योग्य आहे.आज आपण जे काही पोलिस बाबत धोरण राबवत आहोत याचा परिणाम आज नाही तर पुढील १० ते १५ वर्षाने समोर आल्याशिवाय राहत नाही.अनेक आजोबा आहेत जे सांगायचे आमच्या काळात पोलिसाला घाबरून लहान मूल सुद्धा घरातून बाहेर जात नव्हते त्याच पोलीस ला पांडू हवालदार म्हणून हिनवणारा आपलाच समाज आहे.वास्तविक ज्या वेळेस हा चित्रपट आला तेव्हा कोणीही याचा विचार शुद्ध नसेल केला की,पुढे पोलीस अंमलदार यांना अश्या पद्धतीने समाज चिडवणार आहे.पांडुरंग हे अत्यंत चांगले नाव असताना त्याचा “पांडू” हे उपरोधिक नाव झाले.ब्रिटिश सोडले तर स्वतःचे सरकार असून सुद्धा पोलिसांच्या नशिबी कायम उपेक्षा आलेली आहे.कोणीही पोलिस बद्दल आदर व्यक्त केलेला नाही.प्रत्येकाने आपल्या सत्तेच्या दिशेला घेऊन जाणारा असाच वापर केलेला आहे.आज सुद्धा पोलीस दल बळकट करण्याच्या गोष्टी केल्या जातात पण तसं न होता अजून गुंता गुंत निर्माण होत आहे.एक बाजूला तुम्ही बिनधास्त कायदा राबविण्यासाठी लढा असेभाषणातून सांगितले जाते त्याच वेळेस अनेक फास त्याच्या पायात टाकून ठेवले जात आहेत.मानव हक्क आयोग,पोलीस प्राधिकरण,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते,पोलीस दलाची शिस्त,वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोष,कोर्टाची सक्ती,तक्रारदाराची अपेक्षा,आरोपीचा आक्षेप,वकिलांचा दबाव,जनतेची चित्रपट बघून निर्माण झालेली जेम्स बॉण्ड प्रतिमा,आशा अनेक फासात पोलीस अडकला आहे.
सरकार सुद्धा सांभाळायचे म्हणून सांभाळत आहे.ज्या प्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानाला सरकार मध्ये किंमत आहे तेवढी किंमत नक्कीच सरकार देत नाही.आशा अनेक प्रश्नामध्ये पोलीस अडकून आहे.त्या मध्ये जो सापडला त्याचे नशीब वाईट आणि जो वाचला त्याची पुण्याई असे म्हणावे लागेल.आजकाल कोणीही उठते आणि पोलीस वर आरोप करतो इतका पोलीस सोपा झाला आहे.या सगळ्यातून निर्माण झालेली मानसिकता आहे ज्या मधून भर रस्त्यात भांडणे सोडविण्यास गेलेल्या पोलीस वर कोयता मारण्याची हिम्मत होते एका प्रोफेशनल गुंडाची,त्याला हे माहीत आहे की,उद्या अटक झाल्यावर चांगला वकील माझी बाजू घेण्यास उभा राहणार आहे.तो ज्या समाजातून आला आहे त्याचे नेते पुढचा विचार करून त्याच्या मागे उभा राहणार आहे.तो जरी जेल मध्ये गेला तरी त्याचे सहकारी त्याची आत मध्ये बडदास्त ठेवणार आहे उलट पक्षी त्याला आत कैद्यांमध्ये मान मिळणार आहे कारण त्याने ड्रेस वरील पोलिसांवर हल्ला केला आहे.पण ज्या समाजासाठी हा स्वतःचा जीव धोक्यात घातला तो समाज अजिबात बाहेर येणार नाही.फक्त दुरून बघून निघून जाणार आहे.प्रत्येकाने आपल्या भागात लोकांना घडलेली घटना किती वाईट आहे आणि याचा समाजावर किती परिणाम होणार आहे हे सांगितले पाहिजे.जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या जखमी एपीआय साहेबांना भेटून त्यांना “संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे हे सांगितले पाहिजे.जर पोलीस समाजात नसेल तर समाज स्वस्थपणे जगू शकेल का?शेवटी एकच सांगतो प्रत्येक जण आपला समाज,आपले कुटुंब आपली मुलं यांचा विचार करतो पण पोलीस फक्त दिलेले सरकारी कर्तव्य समजून जे पण मिळेल ते काम जीवावर उदार होऊन करतो,त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करत नाही.तो रोज अनेक जीवन मरणाच्या प्रसंग अनुभवत असतो.

Latest News