हडपसर मधील आलिशान सोसायटीमध्ये गांजाची लागवड..

GANJA-1200x1011-1

पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना,)

  • हडपसरमधील काळेपडळ येथील निर्मल टाऊनशिप या आलिशान सोसायटीमध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
  • . हडपसर पोलिसांनी सुरक्षारक्षक पप्पू चुनकौना निशाद (वय २३, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे

.ही झाडे कशाची आहेत, असे विचारले असता निशाद याने ही गांजाची झाडे असून ती आपणच लावली असल्याचे सांगितले.

पोलिसांनी ही दोन्ही झाडे उपटून त्याचे वजन केले असता ते ९४ ग्रॅम भरले. अंमली वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केल्याबद्दल सुरक्षारक्षक पप्पु निशाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तपास करीत आहेत

.याबाबत पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाला सांगितले की, निर्मल टाऊनशिप येथील अ‍ॅमिनिटीजच्या जागेमध्ये सुरक्षा रक्षक राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमागे दोन गांजाची झाडे लावली असल्याचे खास खबर त्यांच्या बातमीदाराने दिली आहे. तपास करण्याचा. आदेश दिला होता

त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे, पोलीस अंमलदार नितीन शिंदे, केसरकर, थोपटे, राऊत, झुंजार, पंधरकर हे निर्मल टाऊनशिप येथे गेले. त्यांनी सुरक्षा रक्षक पप्पु निशाद हा रहात असलेल्या पत्र्याच्या शेडच्या मागे जाऊन पाहणी केली असता तेथे दोन गांजाची हिरवी झाडे लावलेली दिसून आली.

Latest News