आमचा भगवान भक्ती गडावर ”आपला मेळावा होणार” भाजप नेत्या पंकजा मुंडे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, नारायण गडावर देखील एक मेळावा आहे. आमचा मेळावा तर अनेक वर्षे होत आहे. खरं वैशिष्ट्य हेच आहे की जरांगे पाटील हे नारायण गडावर सहभागी होणार आहेत. त्यांचा मेळावा पारंपारिक नसल्यामुळे आम्हालाही उत्सुकता आहे की, ते नक्की काय बोलतील याची आम्हालाही उत्सुकता लागली आहे. तो त्यांचा कार्यक्रम आहे. हा आमचा पारंपरिक कार्यक्रम आहे. आमचा त्यांच्यासोबत काही संबंध असल्यासे कारण नाही. माझ्या मेळाव्यामध्ये ओबीसी, मुस्लीम, बौद्ध समाजातील लोकं येणार आहेत. त्याचबरोबर मराठा समाजातील सुद्धा बांधव अनेक वर्षांपासून माझ्या मेळाव्याला येत आहेत. त्यामुळे माझ्या मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोक येणार आहेत. त्या मेळाव्याचं काही उद्धिष्ट हे नाहीच मुळात राज्यामध्ये दसराच्या निमित्ताने दसरा मेळावा घेतले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे हे दसरा मेळावे जोरदार गाजणार आहेत. विधानसभेच्या प्रचाराचा नारळ देखील या दसरा मेळाव्यातून फोडण्यात येणार आहे. बीडमध्ये राजकीय वातावरण तापले असून जोरदार राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील या नारायणगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. पहिल्यांदाच मनोज जरांगे हे दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठा समाजासोबत संवाद साधणार आहे. त्याचबरोबर भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे या दोघांचा मराठवाड्यामध्ये दसरा मेळावा होणार आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील याचा परिमाण होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, आमचा भगवान भक्ती गडावर आपला मेळावा होणार आहे. मागील 10 वर्षांपासून आपण या ठिकाणी दसरा मेळाव्यातून दसरा साजरा करतो. दरवर्षी भगवान भक्ती गडावर विचारांचं सोनं लुटलं जातं. आणि आमची ती परंपरा आहे. धनंजय मुंडे आणि माझा असा हा एकत्र मेळावा आहे. हा पहिलाच आमचा मेळावा असला तरी आता आम्हाला एका मंचावर येण्याची सवय झाली आहे.