PUNE CRIME: प्रेम संबधांतून एकाच खून….


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-दांडेकर पूल परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. बहिणीला पळवून नेण्याची धमकी त्याने आरोपीला दिली होती. या कारणावरुन आरोपीने कौस्तुभला सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी कौस्तुभला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या कौस्तुभला तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.